भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

जोरदार पावसामुळे संरक्षण भिंत कोसळली

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील बक्षिपूर गावात जोरदार पावसामुळे आलेल्या नागझिरी नाल्याच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे गावातील जुनी संरक्षण भिंत कोसळली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सौ. अर्चना मोरे, प्रभारी उपविभागीय अधिकारी, फैजपूर श्री. निवृत्ती गायकवाड, रावेरचे तहसीलदार श्री. बंडू कापसे तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. रावळ यांनी संयुक्त दौरा केला.

पाहणीदरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व तात्काळ मदत आणि पुनर्बांधणीसाठी स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी नागरिकांनी आपली व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, लवकरच मदत आणि उपाययोजना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!