भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

पाचोरासामाजिक

पाचोरा शहरालगत पुनगाव शिवारातील रस्ता बंद करून, ६० ते ७० कुटूंबानां धरले वेठीस..!

पाचोरा.मंडे टु मंडे न्युज ||बीपाचोरा शहरालगत पुनगाव शिवारातील राधाकृष्णा कॉलोनी  तुन पर्यायी मार्ग हा कंदील नगर  परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी वापरला जाणारा रस्ता भर पावसात अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या परिसरातील सुमारे ६० ते ७० कुटुंबांना या रस्त्यावरूनच दैनंदिन ये-जा करावी लागत होती. मात्र, सदर रस्ता हा ओपन स्पेसमधून जात असल्याचे कारण देत तो बंद करण्यात आल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या प्रश्नाच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या देत संबंधितांना जाब विचारला आणि रस्ता तातडीने खुला करून दुरुस्त करण्याची मागणी केली.

नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली असली, तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, “आम्हाला येण्या-जाण्यासाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा,”अशी मागणी नागरिकांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!