भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

युद्धाच्या झळा ; प्रीमियम पेट्रोल डिझेल महागले

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तेलाच्या किमतीत आलेल्या तेजीचा फटका भारतीय उद्योगांना बसणार आहे. प्रीमियम म्हणजेच उद्योग, टेलिकॉम टॉवर्स, व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या प्रीमियम किंवा उच्च-दर्जाच्या पेट्रोलच्या किमतीत शुक्रवारी प्रति लिटर २ रुपये तर औद्योगिक वापरासाठीच्या बल्क डिझेलच्या दरात सुमारे २२ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांसाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. आमचे प्राधान्य ग्राहकांना ऊर्जा उपलब्ध करून देणे आहे.

काय असतो या पेट्रोलमध्ये फरक?सामान्य पेट्रोलमध्ये ९१-९२ ऑक्टेन रेटिंग असते जे दैनंदिन ड्रायव्हिंगसाठी पुरेसे कार्यक्षमतेचे असते. प्रीमियम पेट्रोलमध्ये ९५-९८ ऑक्टेन रेटिंग असते, ज्यामुळे ते उच्च-कार्यक्षमता किंवा उच्च-कंप्रेशन इंजिनसाठी अधिक योग्य ठरते.

गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन दरवाढीची जी टांगती तलवार होती, ती अखेर प्रीमियम इंधनावर पडली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल (Crude Oil) १०८ ते ११९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने तेल कंपन्यांनी शुक्रवारी रात्री किमतीत सुधारणा केली आहे.

सर्वसामान्य ग्राहकांसाठी याचा परिणाम नाहीत. कारण सामान्य पेट्रोलच्या किमती त्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, एक्सपी ९५ आणि पॉवर पेट्रोलसारख्या उच्च-ऑक्टेन इंधनाचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या इंधन खर्चात किरकोळ वाढ होईल. कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्यास, व्यापक इंधन दरवाढ नाकारता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!