माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या घरावर मारला चोरट्यांनी डल्ला
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते
आ. एकनाथराव खडसे यांच्या जळगाव येथील शिवराम नगर मधील बंगल्यावर रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यात सुमारे ९ तोळे सोने चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. माजी मंत्र्याच्या घरी चोरी झाल्याने घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री तथा विधान परिषदेतील आ. एकनाथराव खडसे यांचे जळगाव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवराम नगर येथे अनेक वर्षांपासून घर आहे. या घरामध्ये आ. खडसे हे नेहमी ये-जा करीत असतात सध्या दिवाळीनिमित्त आमदार खडसे हे त्यांच्या मूळ गावी कोथळी येथे होते. दरम्यान मंगळवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घराची राखण करणारा कर्मचारी चेतन हा जेव्हा आला, तेव्हा त्याला गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लगेच आ. खडसे आणि कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांना कळवले. अशोक लाडवंजारी यांनी येऊन घराची तपासणी केली असता घरातून ८ ते ९ तोळे सोने व ३५ हजार रोख रक्कम चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. माजी मंत्र्याच्या घरी चोरी झाल्याने घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री तथा विधान परिषदेतील आ. एकनाथराव खडसे यांचे जळगाव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवराम नगर येथे अनेक वर्षांपासून घर आहे. या घरामध्ये आ. खडसे हे नेहमी ये-जा करीत असतात सध्या दिवाळीनिमित्त आमदार खडसे हे त्यांच्या मूळ गावी कोथळी येथे होते. दरम्यान मंगळवारी दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घराची राखण करणारा कर्मचारी चेतन हा जेव्हा आला, तेव्हा त्याला गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी लगेच आ. खडसे आणि कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांना कळवले. अशोक लाडवंजारी यांनी येऊन घराची तपासणी केली असता घरातून ८ ते ९ तोळे सोने व ३५ हजार रोख रक्कम चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यात आ. खडसे यांच्या ४ अंगठ्या आणि त्यांच्या घरातील कर्मचारी गोपाल सरोदे यांचे ६ ते ७ तोळ्याचे सोने असे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
यानंतर रामानंदनगर पोलीस स्टेशन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना माहिती कळवण्यात आली. पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासणीला सुरुवात केली. या ठिकाणी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांनी पाहणी केली. श्वानाने घरापासून आचार्य विद्यालयापर्यंत मार्ग दाखवला. मात्र तो तेथेच घुटमळ्ल्याचे दिसून आले. दरम्यान या घटनेमुळे आता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते अशोक लाडवंजारी आणि सुनील माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीची निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज मिळते काय याबाबत तपासणी केली. फॉरेन्सिक पथकाला या ठिकाणी बोलाविण्यात आले.
