भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

दरवर्षाप्रमाणे हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडावे – आ. चंद्रकांत पाटील यांची तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे मागणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके |
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा लक्षणीय वाढला असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हतनूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. या अतिरिक्त पाण्याचा योग्य नियोजनपूर्वक उपयोग करून दरवर्षाप्रमाणे ओझरखेडा धरणात पाणी वळविल्यास तेथील जलसाठ्यात वाढ होईल. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊन खरीप तसेच आगामी रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळेल.


ओझरखेडा धरण हे भुसावळ तालुक्यासह परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचे जलस्रोत असल्याने धरणातील पाणीसाठा वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तरी दरवर्षाप्रमाणे यंदाही हतनूर धरणातून ओझरखेडा धरणाकडे तातडीने पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!