रावेर तालुका केमिस्ट असोसिएशन अध्यक्षपदी विजय चौधरी, उपाध्यक्षपदी सर्वेश किशोर लोमटे यांची निवड
रावेर, मंडेटू मंडे न्युज प्रतिनिधी : रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा दत्तगुरु लॉन्स, रावेर येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत आगामी कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सचिव अनिल झवर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.
यावेळी रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय गोपाल चौधरी (त्रिमूर्ती मेडिकल) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सर्वेश किशोर लोमटे (श्रीहरी मेडिकल, सावदा), सचिवपदी प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी (कोमल मेडिकल) तर खजिनदारपदी निलेश यादव महाजन (साई श्रद्धा मेडिकल) यांची निवड करण्यात आली.
सहसचिवपदी पवन किशोर पाटील (सूर्या मेडिकल), अंशुल ज्ञानेश्वर महाजन (ज्ञानछाया डिस्ट्रिब्युटर) तसेच सोशल मीडिया प्रमुखपदी संकेत पाटील (संकेत फार्मा अँड मेडिकल) यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज महाजन, प्रमोद महाजन, रुपेश चौधरी, निकीत परदेशी, भरत येवले, अंकुश महाजन, ललित पाटील, मुदस्सिर शेख यांची निवड करण्यात आली.
यावेळी रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंद महाजन, माजी उपाध्यक्ष गुणवंत भंगाळे, माजी सचिव प्रवीण सरोदे, माजी खजिनदार लखन सावळे, माजी अध्यक्ष संजय चौधरी, दीपक लोमटे तसेच इतर माजी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. तसेच तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


