भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला डंपरची धडक, एकाचा जागीच मृत्यू,एक गंभीर

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मुक्ताईनगर – बोदवड परिसरातील “शिरसाळा मारुती” म्हणून प्रसिद्ध असलेल्या मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मित्रांसह दुचाकीवर निघालेल्या
दोन तरुणाचा भीषण अपघात झाला, त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपर ने जोरदार धडक दिल्याने त्यात हर्षल राजू पाटील (वय १९, रा. वराड, ता. धरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी वरील त्याचा मित्र कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड, ता. धरणगाव) हा गंभीर जखमी झाला. ही घटना आज शनिवार दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील टोल नाक्या जवळ घडली.

आज शनिवार दि. १९ रोजी मोठ्या पहाटे हर्षल पाटील हा तरुण गावातील ८ ते १० मित्रांसोबत बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाला होता.

नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात हर्षलचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला कुणाल पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हर्षल हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून हर्षल पाटील हा वराड येथे आई-वडील व बहिणीसोबत राहत होता. घटनेनं धरणगाव तालुक्यातील वराड परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!