भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

६४ वा अशोक विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

खिर्डी (प्रतिनिधी)। दि.२५ रोजी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मध्ये ६४ वा अशोक विजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ८:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समाज बांधवांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्या नंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, व समीक्षा झेरॉक्स चे संचालक तथा बौद्धचार्य राजेंद्र अटकाळे यांनी उपस्थित जनसमुदाय त्रीशरण व पंचशील दिले. या प्रसंगी मा. नगरसेवक अँड., योगेश गजरे, कामगार नेते दिलीप कांबळे, तलाठी दादाराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संघरक्षक तायडे (धुमा भाऊ), समता सैनिक दल ता. अध्यक्ष बाळू रजाने, वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष बाळू शिरतुरे, युवक काँग्रेसचे मा. जिल्हाध्यक्ष पंकज वाघ, सामाजिक कार्यकर्ते सावन मेढे, ध्रुव ऑनलाईन चे संचालक धनराज घेटे, दिलीप लहासे, भारतीय बौद्ध महासभेचे सदाशिव निकम, बाळू तायडे, नगीण तायडे, अनिल घेटे, अमर तायडे, निलेश तायडे, सदाशिव गजरे, प्रदीप घेटे, ज्ञानेश्वर अटकाळे, पुंडलिक कोंघे, नितीन तायडे, रत्नाकर बनसोडे, योगेश तायडे, अनिल तायडे, विलास लहासे, विशाल तायडे, शुभम मोरे, प्रभाकर तायडे, किशोर तायडे, दत्तू घेटे, गौतम तायडे, व्यंकट ससाणे, अमर पारधे, आकाश तायडे, यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!