क्राईमजळगावधरणगाव

अल्पवयीन मुलीवर ४३ वर्षीय व्यक्तीचा वारंवार अत्याचार, आरोपी ताब्यात

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || एका साडेसोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४३ वर्षीय व्यक्तीने वारंवार अत्याचार केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात
समोर आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर २०२६ पूर्वी आरोपी मंगल गन्साराम महाले-भिल (वय ४३) याने धरणगाव तालुक्यातील गावालगत असलेल्या झेरी नाल्याच्या काठावरील झाडाझुडपांच्या परिसरात अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले.

या प्रकरणी पोलिसांनी मंगल महाले याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!