वाढदिवसाचा उत्सव नव्हे, जनसेवेचा संकल्प! आ. चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आदेशाने सावद्यात भव्य महाआरोग्य शिबिर, ७० ते ८० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड
सावदा. ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज || मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे माननीय लोकप्रिय आमदार श्री. चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या आदेशाने सावदा नगरपालिकेजवळ भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिराचे सुरज परदेशी. शिवसेना शहर प्रमुख, सावदा. निलेश चंद्रकांत खाचणे. शिवसेना शहर संघटक, सावदा.व पदाधिकारी यांनी आयोजन केले होते.
महाराष्ट्रातील सध्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी लक्षात घेता मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या आदेशाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोरगरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळावेत, आर्थिक अडचणींमुळे ज्यांचे महत्त्वाचे उपचार रखडले आहेत, त्यांना शक्य ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देता यावी आणि जास्तीत जास्त नागरिकांना या शिबिराचा लाभ मिळावा, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश होता.
शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, हाडे व सांधे, हृदयरोग, दंतचिकित्सा, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, बालरोग तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ७० ते ८० रुग्णांची निवड
शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सुमारे ७० ते ८० रुग्णांची निवड करण्यात आली आहे. संबंधित रुग्णांचे आवश्यक फिटनेस प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधानजी महाजन, श्रीकांतजी शिंदे फाउंडेशनचे जिल्हाप्रमुख पवन सोनवणे,शाम भाऊ अकोले न. पा.नगरसेवक सावदा. नगरसेवक सुरज परदेशी. शिवसेना शहर प्रमुख, निलेश चंद्रकांत खाचणे. शिवसेना शहर संघटक, वेडू लोखंडे, राहुल पाटील, भगवान पाटील, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सावदा वैशाली पाटील, भाजपा माजी शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, प्रतीक भारंबे, महेश अकोले, तसेच राकेश बोराखडे, प्रदीप करोसिया, शुभम लोणारी, भूषण परदेशी, दीपक बडगे यांच्यासह तोला मोलाचे शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, स्वयंसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्या व वैद्यकीय मार्गदर्शन मिळाल्याने शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

