भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

ऐनपुर महाविद्यालयात वृक्षारोपण

ऐनपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनपूर गावाचे प्रथम नागरिक अमोल महाजन ,सरपंच यांच्या हस्ते तसेच ऐनपूर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काशीनाथ शामू पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी.अंजने, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एन. रामटेके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. उमरीवाड, महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पी पाटील, रा.से. यो चे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. जे.पी. नेहेते, महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. सतीश वैष्णव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर यांनी ही विविध रोपांची लागवड केली. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृक्ष रोपणा करिता उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!