9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आसेमं संघटनेची बैठक संपन्न! यावल प्रकल्प अधिकारींशी केली चर्चा..
यावल/रावेर. मंडे टु मंडे न्युज | आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करणे कामी संघटनेची यावल येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजू इब्राहिम तडवी प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून हाजी हनिफ अप्पा तडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी प्रदेशाध्यक्ष कामिल नामदार तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक तडवी अनिल तडवी उपस्थित होते.
दरम्यान आदिवासी दिन साजरा करणेबाबत चर्चा झाली यामध्ये संघटनेच्या वतीने आदिवासी पारंपारिक नृत्य संस्कृती वेशभूषा पारंपारिक वाद्य साजोणीनृत्य तसेच संस्कृती जतन संवर्धन व प्रदर्शन यावर देखावे सादर करण्याचे एकमताने ठराव मंजूर करण्यात आले आदिवासी तडवी भिल समाज गठीत आदिवासी उत्सव समिती आर्थिक श्रमिक तन-मन धनाने सहकार्य करणेबाबत एक मताने मंजूर केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांनी आपले विचार विनिमय व्यक्त केले.
सभेनंतर आदिवासी सेवा मंडळ संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यांची भेट घेतली. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी संघटनेने समाजातील विविध अडीअडचणी समस्या मांडल्या,आदिवासी समाजाकरिता असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करणेबाबत चर्चा केली यामध्ये पिसा क्षेत्रातील रहिवासी दाखले शबरी घरकुल, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विहीर क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारणी बाबत, जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करणे बाबत न्यूक्लियस बजेट योजनेचा लाभार्थी निधी वाढविणे यासोबत अनेक विविध ठराव मांडण्यात आले.
यावेळी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ईरफान सर, मुबारक गुरुजी युवक जिल्हाध्यक्ष बिराज तडवी मुक्तार साहेब, गफूर तडवीसर मुसा तडवी मन्सूर तडवी राजू मुशीर तडवी रोशन तडवी सत्तार तडवी ठाकूर दादा गणीभाई शब्बीर तडवी उस्मान तडवी सलीम मुशीर फिरोज अब्बास सलीम तडवी डॉक्टर लुकमान तडवी आदींसह आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते


