वडगाव येथे केळीच्या बागेत आढळले पुरुष जातीचे एक दिवसाचे जिवंत बाळ……
गोलवाडे, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज. जीवन महाजन | रावेर तालुक्यातील वडगाव शेत शिवारात उटखेडा – चिनावल रोड दरम्यान श्री तुषार भास्कर पाटील यांच्या गट क्र . ९६ या केळीच्या बागेत एक दिवसाचे जन्म दिलेले पुरुष जातीचे जिवंत बालक आढळून आले.. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
याबाबत असो की दिनांक १८ जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एक अज्ञात महिलेने बाळाला जन्म देऊन केळीच्या बागात सोडून पलयान केलं. याबाबत चिनावल – वडगाव येथील पोलीस पाटील निलेश नेमाडे यांनी लागलीच निंभोरा पोलीस ठाण्यात माहिती दिली.
सपोनि. हरिदास बचरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिपाली पाटील व पोलीस घटनास्थळी जाऊन एक दिवसीय बाळाला ताब्यात घेऊन जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास पाठवले या कामी चिनावल येथील डॉक्टर जयंत पाटील यांनी देखील सहकार्य केले याबाबत निंभोरा येथील पोलीस स्टेशन मध्ये येथील पोलीस पाटील यांनी फिर्याद दिल्याने या एक दिवसीय बालकाच्या अज्ञात आई व वडिलांच्या संदर्भात निंभोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनी. श्री हरिदास बोचरे. यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दिपाली पाटील व पोलीस तपास करत आहे………
