भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथे अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीवरून विधी संघर्षग्रस्त बालकाकडून धान्य व भांडी हस्तगत

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 224/2025 भा.दं.वि. कलम 305 (a), 331 (3), 331 (4) अंतर्गत एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. दिनांक 14 जुलै 2025 रोजी पदमाबाई पंडीत पाटील (वय 64), व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा. आठवडे बाजार, जुनेगाव, ता. मुक्ताईनगर यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडून खालीलप्रमाणे धान्य व भांडी साहित्य चोरीस गेले होते:

52 किलो मुगडाळ – किंमत अंदाजे ₹52,00
150 किलो तांदूळ – ₹12,00
100 किलो वाटाणा – ₹7,000
33 किलो मसूर डाळ – ₹2,640
24 पाऊच सोयाबीन तेल – ₹3,120
कुकर व भांडी साहित्य – ₹700
या सर्व साहित्याची एकूण अंदाजे किंमत ₹19,860 इतकी आहे. तपासामध्ये उघडकीस आले की, वरील सर्व साहित्य विधी संघर्षग्रस्त बालकाकडून हस्तगत करण्यात आले आहे.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ ३ दिवसांत पोलीस निरीक्षक मा. श्री. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. 2867 महेंद्र शांताराम सुरवाडे आणि पो.कॉ. 1913 श्रावण भिल यांनी तपास करत ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!