Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजामनेर

JAMNER CRIME : ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; जामनेर मध्ये ३० वर्षीय संशयिता विरुद्ध गुन्हा

जामनेर.मंडे टु मंडे न्युज || जामनेर शहर परिसरात ११ वर्षीय मुलाला २० रुपयांचे आमिष दाखवून नदीकाठच्या झाडीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक  अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी ३० वर्षीय संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता पीडित मुलगा आपल्या भावांसोबत कांग नदी परिसरात गेला होता. यावेळी संशयिताने त्याला २० रुपये देण्याचे आमिष दाखवून नदीजवळील झाडीच्या परिसरात नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर संशयिताने मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी जामनेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१ (२) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कलम ४(२), ६, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंके करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!