Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावधार्मिकसामाजिक

सावदा येथे २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव ; नोंदणी ची मुदत २४ सप्टेंबर पर्यंत, केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजन

सावदा.ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज || केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून महोत्सवात सहभागी होण्यासाठी २४ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे.

भुलाबाई महोत्सवात सहभागी होण्यासाठी तीन गट आहे. पहिला लहान गट 3 ते 10 वर्षे, मोठा गट 11 ते 16 आणि तिसरा खुला गट 17 वर्षांपासून पुढील मुली, महिलांना सहभाग घेता येणार आहे. यात स्पर्धेकांना स्वतःच गायन, वादन, टिपऱ्यांवर नृत्य करायचे आहे, या सादरीकरणासाठी 5 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्या संघाना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार असून सहभागी सर्व संघ आणि संघातील सदस्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

रविवार दिनांक 27 रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी २४ सप्टेंबर पर्यंत 9960577698 या क्रमांकावर किंवा सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे संपर्क साधून नोंदणी करणे गरजेचे आहे.

या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्याशी ९९६०५७७६९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या महोत्सवात शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, भजनी मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!