वडील रागावल्याचा राग, मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वडिल रागविल्याचा राग मनात धरून प्रज्ञा रवींद्र शिंदे,वय १६ वर्ष. रा. खेडी हुडको परिसर.जळगाव. या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी १९ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अधिक माहिती अशी की, जळगाव मधील खेडी हुडको परिसरात रवींद्र शिंदे हे पत्नी, तीन मुली व दोन मुलां सह राहत असून ते सेंट्रिंग चे काम करतात. १८ जून रोजी बुधवार त्यांची मुलगी प्रज्ञा बाहेर गेली होती व रात्री ८ वाजता ती घरी आली. याबद्दल तिच्या वडिलांनी तिला विचारणा करीत रागावले वडिलांनी रागविल्याने चिडलेली प्रज्ञा कुणाला काहीही न सांगता पुन्हा घरातून निघून गेली. राहत्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बैठक हॉलजवळ असलेल्या विहिरीत तिने उडी घेतली.सदरील घटना ही १९ जून गुरुवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच प्रज्ञाचे नातेवाईक व शनिपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मुलीला विहिरीतून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

