भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते काशिनाथ शामू पाटील यांचा सन्मान पत्र देऊन गौरव

ऐनपुर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | ऐनपुर तालुका रावेर येथील काशिनाथ शामू पाटील यांचा पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे निस्वार्थ समाजकार्य करत असतांना जनसेवेची भावना ठेवून ऐनपुर येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पद सांभाळून ऐनपुर येथील तंटे गावातच मोडून निंभोरा पोलिस स्टेशन च्या पोलिसांना सतत मदत करुन पोलिस विभाग व समाजामध्ये एक चांगला ठसा त्यांनी उमटवला आहे या कार्याची दखल पोलिस प्रशासनाने घेऊन जळगाव पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन काशिनाथ शामू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

काशिनाथ शामू पाटील यांच्या वतीने निंभोरा पोलिस स्टेशन चे पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमात भाग घेतला काशिनाथ शामू पाटील यांनी सन्मान स्विकारताना सर्व पोलीस प्रशासनाचे तसेच विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांचे मनापासून आभार मानले या सन्मानाने युवकांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली असून पोलिस आणि समाज यामधील बंध अधिक दृढ होण्यासाठी हातभार लागणार आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!