भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगावजळगाव

आरोग्य सेविकेचा विनयभंग, वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, आरोग्य विभागात खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकाऱ्याने आरोग्यसेविकेचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली.पुनर्नियुक्ती प्रस्तावावर सही घेण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी राजपूत यांनी आरोग्य सेविकेला मित्राच्या दुकानावर बोलावले. तेथे आरोग्य सेविकेला अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याची घटना दि. ९ जून रोजी घडली होती.

अधिक वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका कंत्राटी पद्धतीने नोकरीस आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या अंगलट येण्याचा प्रयत्न करीत होते. अकरा महिन्यानंतर त्यांच्या पुनर्नियुक्ती प्रस्तावावर वैद्यकीय अधिकारी यांची सही लागत असल्याने त्या दि. ९ रोजी पुनर्नियुक्ती प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. वैद्यकीय अधिकारी राजपूत याने त्यांच्याशी पुन्हा अश्लील भाषा वापरून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. महिलेने दि. १७ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी राजपूत यांच्या विरुद्ध विनयभंग व अट्रॅसीटीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!