भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगावात उपचारासाठी दाखल महिला बांगलादेशी : कागदपत्रांच्या पडताळणी नंतर गुन्हा दाखल

जळगाव.मंडे टु मंडे न्युज ||उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित महिलेविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी एका महिलेला उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अंमलदाराला सदर महिला बांगलादेशी नागरिक असण्याचा संशय आला. त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रुग्णालयात जाऊन महिलेची चौकशी केली. तसेच तिच्याकडील कागदपत्रे, ओळख आणि इतर तपशीलांची पडताळणी करण्यात आली. या तपासात ती बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मो. अकीजारा अख्तर (वय २५) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून, तिच्या पतीचे नाव फरहाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ती बांगलादेशातील ढाका विभागातील जमालपूर जिल्ह्यातील बक्षीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागारचर युनियन, पोस्ट भाटखांडारा परिसरातील असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मो. अकीजारा अख्तर (वय २५) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिच्या भारतातील वास्तव्याबाबत तसेच ती जळगावात कशी आली, यासह अन्य बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!