भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; जळगावात गुन्हा दाखल

जळगाव.मंडे टु मंडे न्युज || इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा विश्वास संपादन करत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप असलेल्या तरुणाविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील सारा हॉटेल तसेच नाशिक येथील टाउन हाऊस हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीसोबत इन्स्टाग्राम अॅपद्वारे ओळख झाली होती. आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान जळगाव शहरातील सारा हॉटेल येथे, तसेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान नाशिक येथील टाउन हाऊस हॉटेलमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीत पुढे नमूद केल्यानुसार, आरोपीने नंतर लग्न करण्यास नकार दिला आणि पीडितेला मानसिक त्रास दिला. या प्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकाश गजानन चव्हाण (वय ३५, रा. बोरगाव, ता. जि. अकोला, ह.मु. चित्रकूट, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पीएसआय सावित्री ढगे यांच्याकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अद्याप अटकेत नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!