मोठी बातमी : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? काही तरी घडणार? ठाकरे गटाचे….
मुंबई, मंडे टु मंडे न्युज | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, ठाकरे गटाचे काही खासदार उप मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याच्या आणि महायुतीत गुप्त बैठका सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटात पडझड सुरू झाल्याची मोठी चर्चा सुरू झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे ५ ते ७ खासदार स्वतंत्र गट स्थापन करून उप मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या हालचालींना ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) असेही नाव दिले जात आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांत गुप्त बैठकांचे सत्र वाढले आहे. आगामी काळात राजभवनावर काही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील काही खासदार संपर्कात असल्याचे सूतोवाच करत, येत्या काही दिवसांत मोठा राजकीय भूकंप होईल, असा दावा केला आहे.
येत्या काही दिवसात ठाकरे सेनेचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दिसतील असा दावा मोठ्या नेत्याने केला आहे. ऑपरेशन टायगरची तारीख आणि मुहूर्त या नेत्याने सांगितला आहे. पण किती आणि कोण खासदार शिंदे सेनेसोबत येतील याची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे शिंदे सेनेत जाणारे खासदार कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. येत्या एक ते दोन दिवसात याविषयीची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आता पुन्हा काही खासदार शिंदे सेनेत येण्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो यासाठी अजून आठ दहा दिवस वाट पाहावी लागणार आहे.राज्याच्या राजकारणात नेमके काय घडणार, यावर सध्या सर्वपक्षीय नेत्यांचे आणि जनतेचे लक्ष लागून आहे.

