भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासन मोठा अपघात घडण्याच्या प्रतीक्षेत आहे का ?नागरिकांचा संतप्त सवाल

मुक्ताईनगर प्रतिनिधी, अक्षय काठोके : मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असुन प्रशासन मोठा अपघात घडण्याच्या प्रतीक्षा करत आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असुन नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या भूमिकड़े नागरिकांचे लक्ष लागून आहे.

याबाबत अधिकृत असे की, गेल्या बऱ्याच दिवसापासून मुक्ताईनगर शहरात संभाजीनगर कडून येणारे मोठे कंटेनर व ट्रक मुक्ताईनगर शहरातून बऱ्हाणपूर कडे जात असल्यामुळे शहरातील गजबजलेल्या चौक असलेल्या प्रवर्तन चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे दररोज छोटे-मोठे अपघात घडत असतात.

यातून अपघात घडून मोठी जीवितहानी सुद्धा घडू शकते? परंतु पोलीस प्रशासन यावर कुठली कारवाई करताना दिसून येत नाही आज एकादशी असल्यामुळे मुक्ताईनगर शहरात दूर वरून भावीक भक्त आदिशक्ती मुक्ताई चे दर्शन घेण्यासाठी येत असतात परंतु या वाहतूक कोंडीमुळे त्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे

अवजड वाहतूक कुंड मार्गे वळवण्याची मागणी– संभाजीनगर कडून येणारे ट्रक शहरात येऊ न देता त्यांना जर कुंड, जुने घोडसगाव, दुई,सुकळी मार्गे वळविल्यास शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!