भाजपा मुक्ताईनगर तालुक्याचा मोर्चा; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अश्लील वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी…
मुक्ताईनगर, दि. ३ ऑगस्ट. मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | भाजपा नेत्या तथा भारत सरकारच्या केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मा. तहसीलदार तथा मा. पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत अश्लील, अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानावर घाला घालणारे असून समाजात चुकीचा संदेश देणारे आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, मा. रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. अशा विकृत व समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
यावेळी भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, भाजपा जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललिता महाजन, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील, नगरसेविका साधना बापु ससाणे, नगरसेवक नईम बागवान, वैशाली मनोज जाधव, शितल लक्ष्मन सापधरे, इंद्रायनी प्रकाश भोई, अनुराधा योगेश चौधरी, सालबर्डी माजी सरपंच तृप्ती तुषार राणे, स्वाती पंकज भारंबे, कोथळी सरपंच नारायण चौधरी, प्रशांत महाजन, बापु ससाणे, लक्ष्मन सापधरे, बाळा चिंचोले, कैलास वंजारी, दत्ता जोगी, माजी सरचिटणीस अंकुश चौधरी, पंकज पाटील, पंकज सरोदे, मयूर महाजन, जुबेर अली, अनिस पटेल, विनायक पाटील, प्रशांत जंगले, उमेश राणे, योगेश चौधरी, ललित खडसे, जानकीराम पांडे, सुनिल श्रीखंडे, सोमनाथ पाटील, योगेश मनसुटे, सार्थक पाटील, जयेश कारले, लखीचंद जैन, भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आघाडी-सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


