ब्रेकिंग : राज्यातील दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप, नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |नाशिकमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांसोबत शरीरसंबंध ठेवत त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप होत असलेल्या महिलेची पोलिसांमार्फत सध्या चौकशी केली जात आहे. नाशिक येथील हनी ट्रॅप प्रकरणी एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत करूणा मुंडे यांनी या पीडित महिलेची बाजू मांडली. आपल्यावर २ पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला. असा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केल्याने खळबळ उडाली आहे.
या महिलेनं ठाण्यातील एक एसीपींनी आपल्यासोबत ओळख काढत माझा फोन नंबर घेतला. यानंतर त्यांनी माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली.मला चहा घेण्यासाठी पोलिस स्टेशनलाही बोलावल्याचं सांगितलं.त्याचवेळी संबंधित एसीपींना त्यांच्या बायकोचाही फोन आला आणि त्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यावर तेथे त्यांची बायको नव्हती तर एसीपी दर्जाचा आणखी एक अधिकारी होता. तिथे या दोघांनी मला पाण्यातून गुंगीचं औषध देत माझ्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक दावा या महिलेने केला आहे.
यानंतर आपण याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून जबाबही घेण्यात आला. पीआय पदावरील महिला पोलीस अधिकाऱ्यानं मला शांत बसायला सांगत माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. माझ्यासोबत माझ्या मुलीवरही गुन्हा दाखल केल्याचंही म्हटलं.आपण तीन महिने महिला आयोगाकडे जात असून महिला आयोगानं यावर काहीच केलं नाही. असाही आरोप महिलेने केला आहे.
शासकीय यंत्रणेतले अनेक उच्चाधिकारी हनीट्रॅप मध्ये अडकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विधानसभेत केला होता. याच नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात अत्यंत धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. यात महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. पीडित महिलेने असाही आरोप केला आहे की, मी याबाबत तक्रार करायचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी आपल्यासह आपल्या मुलीवरही गुन्हा दाखल केल्याचा आरोप महिलेनं केला. त्या २ पोलीस अधिका-यांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये टू बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याठिकाणी बांगलादेशी महिला आणतात आणि दारू पार्टी करून त्यांचा वापर करतात असा आरोपही पीडितेनं केला. या आरोपाने खळबळ उडाली आहे.
हनी ट्रॅप प्रकरणात दिवसेंदिवस अनेक नवनवी धक्कादायक माहिती समोर येत आहे. करुणा शर्मा-मुंडे यांनी मंगळवार दिनाक २२ रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेची बाजू मांडत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी या महिलेची बाजू मांडताना थेट महाराष्ट्रात सध्या महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला.


