भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

शिंदे सेनेच्या वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू मिळणार? मंत्रिमंडळ विस्तारा आधीच शिवसेनेत खळबळ

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वाचाळवीर आणि सुमार कामगिरी करणाऱ्या शिंदे सेनेच्या (शिवसेना) मंत्र्यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार असून, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या निर्णयामुळे पक्षात मोठी अस्वस्थता आणि खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता महायुती सरकारमध्ये सध्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील विशेषतः शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिम सुधारण्याच्या उद्देशाने यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषांवर केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाची डोकेदुखी ठरणाऱ्या अनेक मंत्र्यांना थेट डच्चू दिला जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड: महायुती सरकारमधील मंत्र्यांची कामगिरी तपासली जात असून, ज्यांची कामगिरी संथ आहे, मतदारसंघात ताकद घटली आहे आणि फाईल्सचा निपटारा वेगाने झाला नाही, अशा मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे.

वाचाळवीरांना लगाम: विनाकारण वादग्रस्त विधाने करून पक्ष व सरकारला अडचणीत आणणाऱ्या वाचाळवीर मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून, पक्षाची प्रतिमा सुधारण्यावर वरिष्ठ नेतृत्वाचा भर आहे.

इच्छुकांची मोर्चेबांधणी: विद्यमान मंत्र्यांपैकी काहींची उचलबांगडी होणार असल्याने, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या तरुण आणि अभ्यासू आमदारांनी मुंबई ते दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी सुरू केली आहे।

शिंदेंचा पूर्वीचा फॉर्म्युला: “अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर इतर आमदारांनाही मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते, ज्याची अंमलबजावणी आता होताना दिसत आहे।

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!