धन्वंतरी दिनानिमित्त ग्रामीण उप रुग्णालयात प्रतिमा पूजन व आरोग्य विषयक संकल्प
मुक्ताईनगर. मंडे टू मंडे न्युज. प्रतिनिधी || ग्रामीण उपरुग्णालय, मुक्ताईनगर येथे धन्वंतरी दिनानिमित्त भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मा. श्री. प्रदीप सोनार, आर्ट ऑफ लिव्हिंग योगशिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवर, डॉक्टर, कर्मचारी व नागरिकांनी आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. भ्रूणहत्येला आळा घालणे, नेत्रदान व देहदान करण्याचा संकल्प करणे, पर्यावरणपूरक दिनचर्या अंगीकारणे, नियमित योग व प्राणायाम करणे तसेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणे, अशा विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांसाठी उपस्थितांनी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमास डॉ. भरत भूषण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. निलेश पाटील यांच्यासह ग्रामीण उपरुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्वंतरी दिनाच्या निमित्ताने आरोग्यविषयक जनजागृतीसोबतच सामाजिक बांधिलकी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.


