भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

‘ताप्ती बेसिन’ प्रकल्पाला गती दिल्या बद्दल आ. अमोल जावळे यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “केळीचे सन्मान चिन्ह” देऊन सन्मान

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आगमन झाले. यावेळी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अमोलभाऊ जावळे यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करत जिल्ह्यातील जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या दूरदृष्टीतून ‘बनाना बेल्ट’च्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या’ महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकारदरम्यानच्या ऐतिहासिक कराराला मान्यता मिळाली आहे.

या प्रकल्पामुळे रावेर, यावल, भुसावळ तालुक्यांतील सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढून कृषी उत्पादनात भर घालण्यास मदत होणार आहे. तसेच जलसंधारणाच्या दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत आमदार अमोलभाऊ जावळे यांनी व्यक्त केले.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जिल्ह्याची कृषी परंपरा आणि ‘बनाना बेल्ट’ची ओळख अधोरेखित करणारे ‘केळीचे प्रतीकात्मक सन्मानचिन्ह’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयभाऊ सावकारे, धुळे शहर आमदार अनुपभैया अग्रवाल, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांतजी पाटील, अमळनेर आमदार अनिलजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!