भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

शेतात रोटर मशीन मध्ये हात – पाय अडकून शेतकऱ्याचा मृत्यू, भुसावळ तालुक्यातील घटना

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्याचा शेतात मशागत करताना मशीनमध्ये हात आणि पाय अडकल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता
विल्हाळे गावात घडली.

भुसावळ तालुक्यातील विल्हाळे या गावाचे शेतकरी कचरू उघडू सुरवाडे वय ७० वर्ष हे यांनी बटाईने घेतलेल्या शेतात रोटरच्या सहाय्याने मशागतीचे काम सुरू केले होते.
काम करत असताना अचानक ट्रॅक्टरवरील तोल जाऊन ते खाली पडले आणि थेट रोटर मशीनमध्ये अडकले. या भीषण अपघातात त्यांचे हात आणि पाय कापले गेले आणि त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कचरू उघडू सुरवाडे, वय ७० वर्ष. यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!