भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ,महिला गंभीर जखमीं

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाट परिसरात डंपर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. वेगवान असलेल्या डंपर ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखन अशोक जोहरी (वय ३२, रा. यावल) हे त्यांच्या मोटरसायकलने भुसावळकडून यावलकडे जात असताना त्यांच्या सोबत वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या होत्या. दरम्यान, यावलहून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने अंजाळे घाट परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की लखन जोहरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी हलविले. गंभीर जखमी अनिता जोहरी यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून संबंधित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती असून या मार्गावरील अंजाळे घाट परिसरात भरधाव वाहतुकीमुळे अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून वेग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!