भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरची जोरदार धडक,दुचाकीचा चक्काचूर, दुचाकीस्वार जखमी !

संतप्त ग्रामस्थांकडून डंपर चालकाला पब्लिक चोप

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावखेडा येथे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर ने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. डंपरच्या पुढच्या टायर खाली येऊन दुचाकीचा चक्काचूर झाला. संतप्त ग्रामस्थांकडून दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाला चांगलाच पब्लिक चोप दिला. मात्र एव्हडा जोरदार अपघात होऊनही सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना दि.२१ जून २०२५ शनिवार रोजी घडली. या घटनेने गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, गौण खनिजांची वाहतूक करताना MH 19 Z 3991या क्रमांकाच्या डंपराने दुचाकीला समोरुन धडक दिल्याने दुचाकी डंपराच्या पुढच्या टायर खाली येऊन संपुर्णपणे त्याचा चुराडा झाला . मात्र यात कुठलीही जीवित हानी झालेली नसल्याची माहिती आहे.

सदरचा अपघात घडताच ग्रामस्थांनी डंपर अडविले असता डंपर चालक दारुच्या नशेत दिसून येताच घटनास्थळावरच संतप्त गावकऱ्यांनी चालकाला चांगलाच पब्लिक चोप दिला. गौण खनिजांची वाहनातून या मार्गावरुन सतत सुसाट वेगाने होणाऱ्या वाहतूक मुळे गावकरी आधीच त्रस्त असताना, यादरम्यान सदरचा अपघात घडल्याने हा प्रकार घडला .

घटनेची माहिती मिळतच सावदा पोलिस ठाण्याचे पोउनि अमोल गर्जे सह पोलिस कर्मचारी आणि इतर पोलिस ठाण्यांचे पोलिसांचा फौजफाटा देखील घटनास्थळी दाखल झाला. यावेळी संतप्त जमावांच्या तीव्र भावना पोलीसांनी समजून घेत.परिणामी लोकांना शांत केले.

पोलिसांनी कारवाई करत गौण खनिजाने भरलेले दोन डंपर सावदा पोलिस ठाण्यात आणले आहे. तरी सदर गौण खनिजांची वाहतूक व उत्खनन वैध की अवैध सध्या गुलदस्त्यात गात असून, महसूल विभाग यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!