आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून गांधी चौकात जलकुंभ उभारणीच्या जागेची गटनेत्या रंजना भारंबे यांनी केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना !
सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील गांधी चौक परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या आ. चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गावहळ्याजवळ प्रस्तावित असलेल्या या जलकुंभाच्या जागेची शिवसेना-भाजपाच्या गटनेता तथा प्रभागाच्या नगरसेविका सौ. रंजना जितेंद्र (जे.के.) भारंबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इंजिनिअर वैभव अहेराव यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेऊन कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
आमदारांच्या निधीतून प्रभागाला मिळणार जलकुंभाची सुविधा
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक ७ मधील गांधी चौक येथील गावहळ्याजवळ हा जलकुंभ उभारण्यात येणार आहे. या जलकुंभामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, या कामासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला नगरपालिका प्रशासनाकडून गेल्या महिन्यात झालेल्या जनरल सभेत देण्यात आला आहे. त्यामुळे जलकुंभ उभारणीच्या कामातील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
मंजुरीची प्रक्रिया पूर्ण; लवकरच निविदा प्रक्रिया
जलकुंभ उभारणीच्या कामाची फायनल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांच्याशी संपर्क केला असता सांगितले अशी माहिती गटनेता नगरसेविका रंजना भारंबे यांनी पाहणीदरम्यान माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, मा. भाजपा शहराध्यक्ष जे. के. भारंबे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्या कडे सदरील कामाची मागणी केली होती प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. जलकुंभाचे काम दर्जेदार पद्धतीने तसेच नागरिकांच्या सोयीचा विचार करून करण्यात यावे, महिला वर्गातील बचत गटांचे कार्य येथे चालत असते त्यांच्या रोजी रोटीचा विचार करून त्यावर गदा न आणता योग्य नियोजन करून यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जलकुंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी विकासाला दिलेले प्राधान्य अधोरेखित केले आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी निगडित असलेल्या पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने परिसरातील नागरिकांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.
कामाची पाहणी करताना केवळ जागेची पाहणी न करता परिसरातील नागरिकांच्या गरजा आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा विचार करून कामाची अंमलबजावणी व्हावी, यावर गटनेता रंजना भारंबे यांनी भर दिला. काम दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.
विकासकामांना निधी उपलब्ध करून देणे जेवढ़े महत्वाचे असते तेवढेच ती मंजूर झालेली कामे प्रत्यक्षात मार्गी लागावी, यासाठी लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा तितकाच महत्त्वाचा ठरतो. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून साकारत असलेला गांधी चौकातील हा जलकुंभ त्याच विकासाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण ठरणार असून, निधीपासून ते प्रत्यक्ष कामाच्या पूर्ततेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या सक्रिय भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.
परिसरातील नागरिकांच्या अपेक्षांना प्रत्यक्ष कामाची जोड मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इंजिनिअर वैभव अहिरराव, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य जे. के. भारंबे, माजी भाजपायुमो तालुका उपाध्यक्ष प्रतिक भारंबे, निलिमा भंगाळे, लिना चौधरी व परिसरातील नागरिक तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

