निवडणूक आयोगाच्या बैठकीतील महागडं पाणी! १ लिटरची किंमत सुमारे ५०० ते ६०० रुपये
नवी दिल्ली. मंडे टु मंडे न्युज || भारतीय निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय बैठकीतील टेबलावर ठेवण्यात आलेल्या आवा (Aava) ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्यांमुळे एका लिटर पाण्याची किंमत सुमारे ५०० ते ६०० रुपये असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या बैठकीचे एक छायाचित्र समोर आले.या फोटोमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह अधिकारी दिसत आहेत आणि त्यांच्या टेबलावर ‘आवा’ (Aava) या ब्रँडच्या २५० मिली क्षमतेच्या काचेच्या छोट्या बाटल्या ठेवल्याचे दिसून आले. बाजारात किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या २५० मिलीच्या एका बाटलीची किंमत अंदाजे १२५ रुपये (किंवा ८ बाटल्यांचा संच सुमारे ९९९ रुपयांना) पडते.
या हिशेबाने एक लिटर पाण्यासाठी सुमारे ५०० ते ६०० रुपये मोजावे लागतात असा अंदाज लावला जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यात अडचणी असताना, निवडणूक आयोगासारख्या उच्च पदावरील अधिकाऱ्यांकडून अशा महागड्या ब्रँडच्या पाण्याचा वापर केला जात असल्याबद्दल सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि यावर बरीच चर्चा सुरू आहे
निवडणूक आयोगाच्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रामुळे सध्या वेगळ्याच मुद्द्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते. या बैठकीच्या छायाचित्रात टेबलवर ठेवलेल्या छोट्या काचेच्या पाण्याच्या बाटल्यांनी अनेकांचे लक्ष वेधले.
या बाटल्या ‘Aava’ ब्रँडच्या असल्याचे वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. संबंधित ऑनलाइन लिस्टिंगनुसार २५० मिलीच्या काचेच्या बाटल्यांचा आठ बाटल्यांचा पॅक सुमारे ९९९ रुपये किमतीला उपलब्ध असल्याचे दिसते. त्यानुसार एका २५० मिली बाटलीची किंमत सुमारे १२५ रुपये, तर एक लिटर पाण्याची किंमत अंदाजे ५०० ते:६०० रुपये इतकी ठरते.
सामान्यतः बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज्ड वॉटरच्या तुलनेत ही किंमत मोठी असल्याने सोशल मीडियावर या बाटल्यांची चर्चा सुरू झाली आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बैठकीतील पाण्याच्या किमतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

