भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिकसावदा

सावदा शहरात हिंदू दफनभूमी सेवा समिती स्थापन

सावदा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज || रावेर तालुक्यातील सावदा नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक ८ मधील हिंदू दफनभूमी तसेच गट क्रमांक ५ मधील लहान मुलांची दफनभूमी यांच्या देखभाल व व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देण्यासाठी ‘हिंदू दफनभूमी सेवा समिती, सावदा’ स्थापन करण्यात आली आहे.

या दोन्ही दफनभूमींच्या संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी तसेच संबंधित समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. याबाबत समितीने सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना २८ सप्टेंबर २०२६ रोजी पत्राद्वारे माहिती दिली आहे.

समितीमध्ये शरद गिरधर भारंबे यांची अध्यक्षपदी, तर जितेंद्र किसन भारंबे व महेश भागवतराव भारंबे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुनिल लक्ष्मण पाटील सचिव, तर भानुदास सखाराम भारंबे सहसचिव म्हणून काम पाहणार आहेत.

समितीच्या सदस्यांमध्ये भरत वसंत नेहेते, डिगंबर महाजन, मनीष भंगाळे, गणेश माळी, सचिन बऱ्हाटे, पराग पाटील, किरण गुरव, विशाल कासार, प्रशांत धोंडू सरवदे, कैलास भाऊलाल लवंगडे, अमित दत्तात्रय महाजन, यांचेसह आदी सभासदांचा समावेश आहे.दफनभूमीशी संबंधित प्रश्न, देखभाल तसेच इतर बाबींमध्ये समितीच्या माध्यमातून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!