भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमफैजपूरयावल

पाडळसा, भालोद येथे गावठी दारू विरोधात फैजपूर पोलिसांची धडक कारवाई ; २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

फैजपूर.मंडे टु मंडे न्युज || अवैध गावठी हातभट्टीची दारू निर्मिती व विक्रीविरोधात फैजपूर पोलिसांनी रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी पाडळसा आणि भालोद परिसरात धडक कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत तयार गावठी दारूसह कच्चे व पक्के रसायन असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाडळसा, ता. यावल येथे गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर रूपा रामू तायडे याच्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत त्याच्याकडून सुमारे २ हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर पाडळसा शिवारातील राजा भोया नाल्याच्या काठावर गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथेही कारवाई केली. या ठिकाणी गणेश रवींद्र कोळी याच्याकडून २०० लिटर गुलमोहर-सागर मिश्रित कच्चे रसायन, २०० लिटर गूळ-नवसागर मिश्रित पक्के रसायन आणि २० लिटर तयार गावठी दारू, असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणीही विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, फैजपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखा, जळगावच्या पथकाच्या मदतीने भालोद, ता. यावल येथे कारवाई केली. या कारवाईत बाबू चांदखा तडवी याच्याकडून २५ लिटर गावठी दारू, अंदाजे २ हजार ५०० रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल बबन प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध हातभट्टीची दारू तयार करणारे तसेच तिची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिला.

फैजपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे पाडळसा आणि भालोद परिसरातील अवैध हातभट्टी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!