भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर!

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | जळगाव जवळील ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर झालेल्या पोलीस छापेमारी प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर दिलासा मिळाला आहे अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हे यांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरिता माळी-कोल्हे यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर छापा टाकला होता. या ठिकाणी बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची ऑनलाइन लूट केली जात असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. या कारवाईत ललित कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार संशयित आणि इतर अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती. तपासाधिकारी उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी न्यायालयात हा संघटित गुन्हेगारीचा (ऑर्गनाइज्ड क्राईम) प्रकार असल्याचे सांगत पोलिसांची बाजू मांडली होती.

कायदेशीर लढा
या गुन्ह्यात अटक झाल्यापासून ललित कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. त्यामुळे कोल्हे यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

अखेर मिळाला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ललित कोल्हे यांना जामीन मंजूर केला आहे. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर प्रक्रियेनंतर कोल्हे यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोल्हे लवकरच कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!