भुसावळ तालुक्यात चार प्रौढांचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चौघांना अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | (१२ ऑगस्ट २०२६ ) भुसावळ तालुक्यातील एका गावात १३ वर्षे ९ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाऊ घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील चार प्रौढ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीन संशयिताचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोहर रामा पाटील (६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (६४), नारायण सोमा चौधरी (५०) आणि विनायक वसंत पाटील (५२), सर्व रा. भुसावळ तालुका, यांचा समावेश आहे.
पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, मुलीच्या अल्पवयीनपणाचा फायदा घेत तिला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले आणि तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.


