भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

BIG BREAKING : इंधन दर वाढीचा भडका!ज्याची भीती होती तेच झालं… पेट्रोल- डिझेलचे दर वाढले

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महागाईचा देशभरातील नागरिकांना आणखी एक झटका बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. आज, शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनांच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याने सर्व सामान्यांना मोठा झटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये ११ पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. सामान्य पेट्रोल २ रुपये ८४ पैसे प्रति लिटरने महागले असून डिझेलच्या दरातही ३ रुपये १ पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार असून वाहतूक क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दर या प्रमाणे …

  • प्रीमियम पेट्रोल — ₹ ३.११ प्रति लिटर वाढ
  • पेट्रोल — ₹ २.८४ प्रति लिटर वाढ
  • डिझेल — ₹ ३.०१ प्रति लिटर वाढ

पेट्रोल दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ
दिल्ली ९७.७७ (+३.००)
कोलकाता १०८.७४ (+३.२९)
मुंबई १०६.६८ (+३.१४)
चेन्नई १०३.६७ (+२.८३)

डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ
दिल्ली ९०.६७ (+३.००)
कोलकाता ९५.१३ (+३.११)
मुंबई ९३.१४ (+३.११)
चेन्नई ९५.२५ (+२.८६).

दैनंदिन जीवनावरही त्याचे पडसाद उमटू शकतात. मालवाहतूक खर्च वाढल्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

दरम्यान, अचानक झालेल्या या दरवाढीमुळे अनेक शहरांमध्ये वाहनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत असून या मुळे घरगुती बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!