सावद्यात तुफान वादळासह गारांचा पाऊस,सावदा-फैजपूर रस्त्यावर झाड कोसळले
सावदा. ता. रावेर.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथे आज दुपारी सुमारे तीन वाजेचे सुमारास तुफान वादळा सह गारांचा पाऊस पडला. तसेच सावदा फैजपूर रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ लिंबाचे भलेमोठे झाड कोसळले त्या मुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.

सावदा येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास गारांचा पाऊस पडला. या वेळी वाऱ्याने भयानक रूप धारण केले होते. या वेळी वारा उधानाणें अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. बातमी प्रसिद्ध करे पर्यंत पाऊस सुरूच होता.

