भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची अहिल्यानगर येथे बदली

सावदा, ता. रावेर मंडे टू मंडे न्यूज नेटवर्क | सावदा पोलिस स्टेशनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कर्तव्यदक्ष, संयमी आणि मनमिळाऊ अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे पोलिस उपनिरीक्षक अमोल नारायण गर्जे यांची नुकतीच अहिल्यानगर येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीची बातमी समोर येताच सावदा परिसरातील नागरिक, सहकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण निरोप देत पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सावदा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असताना अमोल गर्जे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच नागरिकांशी सुसंवादाचे नाते जपले. त्यांच्या शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच नागरिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. कोणतीही समस्या असो किंवा एखाद्या नागरिकाची तक्रार, त्यांनी नेहमीच संवेदनशीलतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्याची दखल घेतली.

गेल्या दोन वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जिव्हाळ्याची वागणूक दिली. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, पारदर्शकता आणि माणुसकीचा समतोल दिसून आला. त्यामुळेच त्यांच्या बदलीमुळे सावदा पोलिस स्टेशनसह शहरातील अनेकांना हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे हे रविवार, दि. ७ जून रोजी दुपारी ४ नंतर सावदा पोलिस स्टेशनचा पदभार सोडून अहिल्यानगर येथे नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत.

मंडे टू मंडे न्यूज परिवारातर्फे शुभेच्छा–

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिक सेवा, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि मनमिळाऊ स्वभावाच्या बळावर नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांचे बदलीनिमित्त “मंडे टू मंडे न्यूज” परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन त्यांच्या पुढील सेवाप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

नव्या ठिकाणीही त्यांच्या कार्याचा ठसा उमटावा, उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे गाठावीत आणि जनसेवेचा हा प्रवास अधिक यशस्वी व्हावा, हीच सदिच्छा! 🌹 – मंडे टू मंडे न्यूज परिवार

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!