कुंभारखेडा सह परिसरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस – शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कुंभारखेडा.ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. प्रा योगेश कोष्टी | आज संध्याकाळी ५ च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार गारपिटी मुळे परिसरातील पिके जमीनदोस्त झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सुलतानी संकटासोबत आता अस्मानी संकटाचा सामना परिसरातील बळीराजाला करावा लागत असून परिसरातील शेतकरी वर्ग पुरता संकटात सापडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , आज दि.४ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास अत्यंत वादळी वाऱ्यांसह परिसरास गारांसह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे परिसरातील नव्याने पेरणी केलेल्या पिकांसह केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून बागायत दाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे परिसरातील केळी बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून गारपीटी मुळे हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून गेला आहे. पावसामुळे कुंभारखेडा नाला भरभरून वाहत असून यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पुरता हवालदिल झाला आहे. प्रशासनातर्फे त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे

