भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

वादळग्रस्त भागांची आमदार अमोल जावळे यांच्याकडून उद्या पाहणी ; प्रशासनाला तात्काळ पंचनाम्यांचे आदेश

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |रावेर मतदार संघातील रावेर आणि यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दिनांक ४ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार अमोलभाऊ जावळे यांनी तातडीने दखल घेत महसूल, कृषी व संबंधित प्रशासनाला उद्या सकाळपासून नुकसानग्रस्त भागांमध्ये त्वरित पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण व पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, आमदार अमोलभाऊ जावळे हे उद्या सकाळी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेणार असून शासनाकडून योग्य ती मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!