भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चोपडाशैक्षणिक

हिंदी दिनानिमित्त प्रताप विद्या मंदिर चोपडा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी सप्ताह

चोपडा. मंडे टु मंडे न्युज. सचिन पाटील | प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे १४ सप्टेंबर हिंदी दिवसानिमित्त हिंदी सप्ताहाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आवड, अभिरुची व सर्जनशीलता निर्माण व्हावी, या उद्देशाने संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम घेण्यात आले.


या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांसाठी हिंदी वक्तृत्व, कविता व कबीरदास, रहीम दास यांचे दोहे गायन, मुहावरे व कहावत यांवर नाटिका सादर करण्यात आल्या, प्रश्नमंजुषा, हिंदी व्याकरण कोडी,पर्यायवाची व विलोम विविध क्रियाकलाप, भाषण, हिंदी भाषा महत्व सांगणारे नाटक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले.


हिंदी सप्ताहाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक रजिश सर व उपमुख्याध्यापिका निखिला मॅम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी हिंदी शिक्षिका सौ. चेतना बडगुजर मॅम, मुस्कान पठान मॅम, प्रतिभा सोनवणे मॅम, आम्रपाली मॅम या शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी प्रेम, आत्मविश्वास आणि अभिमानाची भावना निर्माण झाली. संपूर्ण हिंदी सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
सचिन पाटील चोपडा . मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी.9860219265

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!