रावेर

रावेर मध्ये मधमाशांचा हल्ला ; एक गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीती

रावेर, मंडे टु मंडे न्युज || रावेर शहरातील स्टेशन रोड परिसरात शनिवारी दुपारी अचानक मधमाशांच्या मोठ्या थव्याने नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पुंडलिक कोळी हे गंभीर जखमी झाले असून, गाढे वकील यांनाही मधमाशांनी दंश केल्याने किरकोळ दुखापत झाली.

शनिवारी दुपारी स्टेशन रोडवरून नागरिकांची ये-जा सुरू असताना अचानक मधमाशांचा मोठा थवा नागरिकांच्या दिशेने आला. काही क्षणांतच मधमाशांनी नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. नागरिक तसेच महिलांनी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

दरम्यान, रावेरहून गाते येथे जात असलेले पुंडलिक कोळी हे मधमाशांच्या तावडीत सापडले. मोठ्या प्रमाणावर दंश झाल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच रावेर शहरातील गाढे वकील यांनाही मधमाशांनी दंश केल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ धाव घेत जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. पुंडलिक कोळी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

या अचानक घडलेल्या घटनेनंतर स्टेशन रोड परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मधमाशांचा एवढा मोठा थवा नेमका कुठून आला आणि नागरिकांवर अचानक हल्ला का झाला, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!