भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत रावेर तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच चेंदामेंदा, एक जखमी

मुक्ताईनगर | मंडे टू मंडे न्यूज. अक्षय काठोके | मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रोडवरील धाबेपिंप्री शिवारात सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन असलेल्या ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकीवरील प्रल्हाद मधुकर हिवरे (वय ४२, रा. अजंदे, ता. रावेर) यांचा मृत्यू झाला, तर ईश्वर नामदेव पवार (वय ४०, रा. अजंदे, ता. रावेर) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर मार्गावरील धाबेपिंप्री शिवारातील नायगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन असलेल्या ट्रक क्रमांक एमएच १९ सीवाय ४६१७ वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकी क्रमांक एमएच १९ डीडी १८५८ ला मागून धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या धडकेत प्रल्हाद हिवरे यांचा मृत्यू झाला, तर ईश्वर पवार हे जखमी झाले. जखमी पवार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी ईश्वर नामदेव पवार यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रकचालकाची ओळख व ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नसून, आरोपीला अटक झालेली नाही.

घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोउपनि तुषार पाटील करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!