यावल मध्ये शाळेच्या वॉल कंपाऊंडचे बेकायदा बांधकाम, अवैध वाळू आणि खळी चा जप्ती पंचनामा
यावल, मंडे टु मंडे न्युज | यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा आणि संबंधित ठेकेदाराने कोणतीही प्रशासकीय मान्यता किंवा कार्यारंभआदेश न घेता नगरपालिका मालकीच्या खुल्या जागेवर वॉल कंपाऊंड बांधकाम सुरू केले. यामुळे यावल नगरपालिकेत तातडीची कार्यवाही सुरू केली असून, घटनास्थळी मोठी खळबळ उडाली आहे. आज यावल तलाठी यांनी अवैध वाळू आणि खळी चा जप्ती पंचनामा केला.
प्रशासकीय मंजुरीसह कार्यारंभ आदेश नसताना यावल नगरपालिकेच्या मालकीच्या गट क्रमांक ७५६ या खुल्या जागेवर वॉल कंपाऊंड बांधकाम सुरू करण्यात आले.
नगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, गट क्रमांक ७५६
मधील खुल्या जागेवर अद्याप वॉल कंपाऊंडसाठी कोणतीही प्रशासकीय मान्यता नगरपरिषदेला दिलेली नाही, तसेच ठेकेदारालाही कोणताही कार्यारंभ आदेश मिळालेला नाही. तथापि, शाळेच्या संस्थापकाने आपल्या सोयीने आणि जागेच्या दहा टक्के भागाचा वापर करून ठेकेदाराशी संगनमत करून काम सुरू केले.
नगरपालिकेने आधीच संस्था चालकाला लेखी नोटीस देऊन काम थांबविण्याची सूचना दिलेली होती. तरीही संस्थापक आणि ठेकेदाराने कोणत्या नियमांनुसार आणि कोणाच्या आदेशाखाली काम सुरू केले, पेव्हर ब्लॉक बसवले, तसेच बिना परवाना गौण खनिज वापरला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय अवैध वाळू साठा का ठेवला गेला आणि यावल शहर तलाठी या कामावर का लक्ष ठेवत नव्हता, असा देखील सवाल निर्माण झाला आहे.आज यावल तलाठी यांनी अवैध वाळू आणि खळी चा जप्ती पंचनामा केला असून यावल नगरपालिका पुढे आणखी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
