भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमधुळे

बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त ; ७० हजार बाटल्या, स्पिरीटचे ड्रम सह ८.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर. मंडे टु मंडे न्युज. ||राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील दुर्बड्या शिवारात छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तयार बनावट दारू, स्पिरीट, हजारो रिकाम्या बाटल्या, रिकामे खोके तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण ८ लाख ५२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विजय रमेश पावरा याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, नाशिक विभागीय उपआयुक्त यू. आर. वर्मा आणि धुळे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मुकेश दिनकर पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत दुर्बड्या शिवारातील विजय रमेश पावरा याच्या घराशेजारील पत्रीशेडमध्ये बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
छाप्यात ९० मिली क्षमतेच्या ७० हजार रिकाम्या बाटल्या, तयार देशी दारूचे ब्लेंड १७५ लिटर, स्पिरीटने भरलेला २५० मिली क्षमतेचा प्लास्टिक ड्रम, देशी दारू भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या १८० मिली क्षमतेच्या १ हजार २५० रिकाम्या काचेच्या बाटल्या, देशी दारूच्या नावाचे ७५० रिकामे खोके, तसेच क्रमांक नसलेला FARMATRAC POWERMAX कंपनीचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख ५२ हजार ७५० रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

साथीदारांचा शोध सुरू
बनावट देशी दारू तयार केल्याप्रकरणी विजय रमेश पावरा याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ब), (क), (ड), (ई), (फ), ८०, ८१, ८३ आणि १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट मद्यनिर्मितीसाठी साहित्य पुरविणारे तसेच या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

ही कारवाई दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील, दुय्यम निरीक्षक एस. एस. निकम, निरीक्षक देविदास नेहूल, जवान दारासिंग पावरा, गोरख पाटील, केतन जाधव, मधुकर मस्के, काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, प्रशांत बोरसे, वाहनचालक रवींद्र देसले आणि विजय नाहीदे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!