जळगावात धक्कादायक घटना : अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर ड्रग व दारूचे व्यसन लावून नशेत अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ड्रग व दारूच्या नशेत एका मित्राने महाविद्यालयीन अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली. संशयित तरुणाने पीडितेवर कारमध्ये अत्याचार करून तिचे नग्न फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने सिगारेट आणि ड्रग्सचे व्यसन लावून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्यास मदत केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला. या सततच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने या प्रकरणी ३ जून रोजी रात्री उशिरा तिच्या वडिलांच्या समक्ष रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध पोक्सो (POSCO) कायद्यासह इतर विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
तक्रारीत पीडितेच्या मैत्रिणीनेच तिला या व्यसनाच्या आहारी लावल्याचा आरोप करण्यात आला असून पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण एकाच शाळेत शिकत असताना ऑक्टोबर २०२४ मध्ये पीडिता मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली असता, दुसऱ्या दिवशी मैत्रिणीने तिला पहिल्यांदा सिगारेट दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील गावाला गेले असताना, मैत्रिणीने तिला दिनेश निर्मल तिवारी याच्या सोबत कारमधून नेले. तिथे त्यांनी दारू, सिगारेट आणि गांजाचे सेवन केले. त्यानंतर मोहाडी रोडवरील कारमध्ये दिनेशने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे नकळत नग्न फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार हॉटेलवर बोलवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तरुणाने अल्पवयीन तरुणीसोबत विवाह देखील केला. व दोन तीन महिन्यांनी तिला सोडून देखील दिले. दरम्यान जय चौधरी नावाच्या तरुणाने पीडितेच्या घरी दोन तीन वेळा ड्रग्स आणून दिल्याची माहितीही समोर आली.
आरोपी दिनेश तिवारीने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी धमकी देत पीडितेला घरातून पळवून नेले आणि १५ एप्रिल २०२६ पर्यंत तिला आपल्या घरी जबरजस्ती ठेवले. मात्र त्यानंतर पीडितेने निर्मलच्या घरी जाण्यास नकार दिला असता, निर्मलचा मित्र गौरव पुरोहित याने तिला स्नॅपचॅटवर अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. असेही पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.

