भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगरात मजुराची हत्या; हॉटेल मालकावर खुनाचा गुन्हा

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके
मुक्ताईनगर तालुक्यात थकीत पगाराची मागणी केल्याच्या वादातून एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हॉटेल मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ तारासिंग जाधव (रा. निंबापूर, ता. खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश) हे मुक्ताईनगर परिसरात मजुरीचे काम करत होते. त्यांची पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय ५५) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर–बुरहानपूर महामार्गालगत उचंदा शिवारातील एका शेताजवळ ही घटना घडली. थकीत पगाराची मागणी केल्यावर गोकुळ जाधव आणि हॉटेल मालक कमलजीतसिंग प्रीतमसिंग (रा. शेर-ए-पंजाब हॉटेल, पूर्णाड फाटा, ता. मुक्ताईनगर) यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपीने काठीने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, या हल्ल्यात गोकुळ जाधव यांचा मृत्यू झाला.


या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!