Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ उपविभागात ६ ऑगस्ट रोजी ‘जनसमाधान बैठक’; नागरिकांनी तक्रारींसह उपस्थित राहण्याचे आवाहन

भुसावळ. मंडे टु मंडे न्युज | जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध महसुली, प्रशासकीय तसेच दैनंदिन अडचणींचे जलद आणि कालबद्ध निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ‘जनसमाधान बैठक’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी आणि समस्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

भुसावळ उपविभागासाठी ही बैठक गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे अध्यक्षस्थानी राहणार असून, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत प्रलंबित महसुली अर्ज, फेरफार नोंदी, जमिनीशी संबंधित वाद, प्रशासकीय तक्रारी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणींवर थेट मार्गदर्शन व आवश्यक तो निर्णय दिला जाणार आहे. यासोबतच प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने भुसावळ उपविभागातील नागरिक, शेतकरी आणि अर्जदारांना आपल्या प्रलंबित अर्ज व तक्रारींसाठी आवश्यक कागदपत्रांसह बैठकीस उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!